cricket marathi
information
|
काही काही खेळ हे खेळण्यात जेवढा आनंद मिळतो तेवढाच आनंद तो खेळ पाहाण्यात देखील मिळतो. आजच्या आधुनिक काळात तर विस्तारत गेलेल्या सोयी सुविधांमुळे आपल्या आवडत्या खेळांचे थेट प्रसारण घरबसल्या पाहाणे अत्यंत सोपे झाले आहे.
प्रत्येक देशाचा स्वतःचा असा एक राष्ट्रीय खेळ असतो त्या खेळाची सुरूवात त्या देशापासुन झालेली असते परंतु काही खेळ असेही आहेत की त्या खेळांची लोकप्रियता ही फक्त त्या देशापुरती मर्यादित न राहाता तो खेळ सर्वच देशांचा अत्यंत आवडता खेळ झाला आहे आणि अश्या खेळांमध्ये सर्वात वरच्या स्थानावर असलेला खेळ म्हणजे क्रिकेट!
काहीही शंका नाही की भारतामध्ये क्रिकेट हा केवळ खेळच नाही तर लोकांसाठी हा एक धर्म आहे. लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक व्यक्ती हा क्रिकेटचा चाहता आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रसिद्ध खेळा विषयी काही माहिती.
१) क्रिकेटचा पहिला एकदिवसीय सामना आस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात १९७१ साली खेळला गेला.
2) क्रिकेटचा पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. हा सामना १५ मार्च १८७७ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड वर खेळला गेला.
३) सचिन तेंदुलकर दुनियाचे सर्वात प्रथम खेळाडू आहेत ज्यांना थर्ड अम्पायर ने आउट केले होते.
४) ऑस्ट्रेलियाचा फलंदाज चार्ली बॅनरमन हा जगातील पहिला असे फलंदाज आहे ज्यांनी १८७७ च्या टेस्ट मॅचमध्ये शतक पूर्ण केलेले.
५) सौरव गांगुली हा एकमेव असा खेळाडू आहे ज्याला चार सामन्यांत चार वेळा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मिळाला आहे.
६) इंग्लंडच्या खेळाडू विल्फ्रेड रोडस याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४2०४ बळी व ३९,९६९ धावा केल्या आहेत.
७) इंझमाम उल हक हा पहिलाच पाकिस्तानी खेळाडू आहे की ज्याने आपल्या करिअरच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली.
८) वीरेंद्र सेहवाग चा टी-ट्वेंटी,एकदिवसीय आणि कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा: ११९, 2१९, ३१९ ही संख्या आहे.
९) एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकाचा अष्टपैलू खेळाडू जयसूर्या यांने शेन वॉर्न पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
१०) क्रिस गेल जगातील एकमेव असा फलंदाज आहे ज्याने क्रिकेटच्या कसोटी सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता.
११) राहुल द्रविडच्या धावा + जहीर खानच्या धावा = जॅक कॅलिस च्या धावा + विकेट्स.
१2) ख्रिस मार्टिन आणि चद्रशेखर हे दोन विश्वविक्रमी खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत धावांपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
ख्रिस मार्टिन: ७१ कसोटी, १2३ धावा, 2३३ विकेट
चंद्रशेखर: १६७ धावा, 2४2 विकेट
१३) बॉलिवूड कलाकार सैफ अली खान यांचे आजोबा इफ्टहार अली खान हे एकमेव असे खेळाडू आहेत ज्यांनी क्रिकेटची मॅच दोन देशांच्या वतीने खेळली आहे. त्यांनी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघा तर्फे कसोटी सामने खेळले होते.
१४) इंग्लंडचा फलंदाज अलेक स्टुअर्ट याचा जन्म ८/४/१९६३ ला झाला आणि त्यांने आपल्या टेस्ट मॅच च्या करिअरमध्ये ८४६३ धावा केल्या आहेत.
१५) डॉन ब्रॅडमन या खेळाडूने त्याच्या कारकीर्दीत फक्त सहा षटकार मारले आहेत.
No comments:
Post a Comment